लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने काही युवकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी झारखंडमधील गिरिडीह गावात ही घटना घडली. हा वाद इतका विकोलापा गेला होता की यावेळी दोन गटांत दगडफेक झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – बृजभूषण सिंह यांच्यासोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर साक्षी मलिकने सोडलं मौन; म्हणाली, “आमच्याकडे पर्याय…”

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, गिरिडीहच्या मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीतील एका ठिकाणी लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रात्री २ वाजताच्या सुमारास काही युवक जेवण करण्यासाठी पोहोचले. तसेच त्यांनी गरमागरम पुऱ्यांची मागणी केली. मात्र, पुरी न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. तसेच दगडफेकही झाली. या घटनेत चार जण जखमी झाले.

हेही वाचा – ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना निमंत्रण; या दोघांमध्ये मैत्री कशी झाली?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात बोलताना एसडीपीओ अनिल कुमार सिंह म्हणाले, लग्नसमारंभात जेवण न दिल्याने या युवकांनी मुद्दाम गोंधळ घातला. याप्रकरणी आम्ही एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.