लखनौ : नॉयडातील सुपरटेक ट्विन टॉवर्स प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी व कठोर कारवाई करण्याचा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉयडाच्या सेक्टर ९३ मधील सुपरटेकच्या एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पात इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या ४० मजल्यांच्या दोन उत्तुंग इमारती पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. लखनौत या प्रकरणाचा आढाव घेतल्यानंतर, गरज भासल्यास दोषी व्यक्तींच्या विरोधात फौजदारी प्रकरणे दाखल करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

‘नॉयडातील सुपरटेक एमराल्ड कोर्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे संपूर्ण पालन केले जायला हवे. याप्रकरणी २००४ सालापासून सतत अनियमितता सुरू होत्या’, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी पातळीवर विशेष चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे हा प्रवक्ता म्हणाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action ordered against the culprits in the supertech twin towers case akp
First published on: 02-09-2021 at 01:03 IST