Delhi-NCR Earthquake Today Updates : दिल्ली एनसीआर भागात गुरुवारी (१० जुलै) सकाळी मुसळधार पाऊस चालू असतानाच भूकंपाचे धक्के बसले. १० सेकंद जमीन हादरत होती. त्यामुळे अनेक घरे व इमारतींमधील लोक सुरक्षेसाठी घराबाहेरच्या मोकळ्या जागांमध्ये जमले होते. सकाळी ९.०४ वाजता भूकंपाचे हादरे बसले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार व सोनीपत भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हरियाणातील झज्जर गावात या भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिष्टर स्केल इतकी होती.

दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र, काही वेळ घरांचे दरवाजे व खिडक्या हलताना दिसल्या. त्यामुळे लोक घरं, दुकानं व कार्यालयं सोडून बाहेर पडले. या भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रोसेवा काही वेळ थांबवण्यात आली होती. या भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अशातच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोक घाबरले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूकंप का होतात?

भूकंप शब्दामध्येच याचा अर्थ लपलेला आहे. जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे होणाऱ्या कंपनांमुळे होणारी स्थिती म्हणजे भूकंप असं म्हटलं जातं येईल. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.