छत्तीसगडमधील दक्षिण सुकमामध्ये शनिवारी नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तसंच जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, सुकमामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जवान जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी जवानांना चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्येही छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षल्यांनी मोठा हल्ला केला होता. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास २५ जवान शहीद झाले होते. तर इतर ६ जण जखमी झाले होते.