Vedam Bold Poster : बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अभिनेते आणि अभिनेत्रींची प्रचंड क्रेझ आहे. लोक त्यांची अक्षरशः पूजा करतात. मात्र चित्रपटाच्या एका पोस्टरमुळे ४० अपघात घडले आहेत. एका अभिनेत्रीचं बोल्ड पोस्टर रस्त्यावर लावण्यात आलं होतं. त्या पोस्टरमुळे ४० हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे पोस्टर हटवण्यात आलं आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे.

वेदम नावाच्या सिनेमाचं पोस्टर

वेदम या सिनेमाच्या पोस्टरमुळे ही घटना घडली आहे. हैदराबाद या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आली आहे. हे पोस्टर अत्यंत मादक आणि हॉट होतं. या चित्रपटात अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत आहे. तिचंच बोल्ड पोस्टर लावण्यात आलं होतं. ज्यामुळे ४० हून अधिक अपघात झाले. ज्यानंतर आता हे पोस्टर हटवण्यात आलं आहे. वेदम हा सिनेमा २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, अल्लू अर्जुन, मांचू मनोज, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिक आहेत. हा सिनेमा तेलुगु भाषेतील असून यात अनुष्का शेट्टीने सेक्स वर्करची भूमिका केली आहे. या चित्रपटासाठी अनुष्काने पिवळ्या साडीतले काही फोटो काढले होते. हे सगळे फोटो मादक अंदाजातले आहेत. या बोल्ड फोटोंपैकी एक फोटो हैदराबाद येथील वर्दळीच्या रस्त्यावर पोस्टरवर लावण्यात आला होता. ज्या पोस्टरमुळे ४० अपघात घडले.

दिग्दर्शक क्रिश यांनी काय आठवण सांगितली?

यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी सांगितलं आम्ही चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी काही पोस्टर्स लावले होते. एका भल्यामोठ्या पोस्टरवर अनुष्काचा मादक फोटो होता. मात्र या मादक पोस्टरमुळे ४० हून अधिक अपघात झाले. हे पोस्टर हैदराबाद येथील पूंजागु्ट्टा सर्कल भागात लावण्यात आलं होतं जे नंतर हटवण्यात आलं.

पोलिसांनी या पोस्टरबाबत काय सांगितलं होतं?

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बोल्ड पोस्टरमुळे लक्ष वेधलं जातं आणि अपघात होतात अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आम्ही हे पोस्टर हटवलं. या सगळ्या गोष्टींचा या चित्रपटावर बराच परिणाम झाला असंही दिग्दर्शक क्रिश यांनी सांगितलं. दिग्दर्शक क्रिश यांनी नुकतीच 123Telugu ला मुलाखत दिली त्यात त्यांनी या घटनेबाबत सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदम चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता

वेदम हा चित्रपट ४ जून २०१० ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळालं होतं. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने १० कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र या पोस्टर प्रकरणामुळे नकारात्मक परिणाम झाला आणि चित्रपटासाठी लागलेला खर्चही वसुल झाला नाही. या चित्रपटाला पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तर दोन नंदी पुरस्कार मिळाले. तसंच त्या दशकातल्या उत्कृष्ट दहा चित्रपटांच्या यादीतही हा चित्रपट आहे. हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या पडला तरीही आजही या चित्रपटाकडे कल्ट क्लासिक म्हणून पाहिलं जातं.