…म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर जन्माला येणार नाहीत; भाजपा प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. या महापंचायतीत भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी वादग्रस्त विधानं केली.

'इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर हुमायून जन्माला येणार नाहीत', असं विधान भाजपाचे हरयाणाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल अमू यांनी केलं. (संग्रहित छायाचित्र)
‘इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येणार नाहीत’, असं वादग्रस्त विधान भाजपाचे हरयाणाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल अमू यांनी केलं आहे. गुरगावमध्ये रविवारी महापंचायत पार पडली. या पंचायतीत लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा झाली. यावेळी त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना भाड्यानं घरं देऊ नका, तर त्यांना भारतातून हाकलण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, असं वक्तव्यही केलं.

गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. या महापंचायतीत भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी वादग्रस्त विधानं केली. ते म्हणाले,”जर भारत आपली माता आहे, तर आपण पाकिस्तानचे बाप आहोत आणि या पाकिस्तानींना आपण इथे भाड्यानं घरं देणार नाही. यांना देशातून हाकला, तसा प्रस्ताव मंजूर करा,” असं ते म्हणाले.

“१९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. आपण १० लाख लोकांचे मृतदेह बघितले. त्या मृतदेहांची आतापर्यंत कुठेच माहिती नाही आणि आपण त्यांना घरं भाड्यानं देतोय. इतकंच नाही, तर पतौडीमध्ये त्यांचे पार्क उभारले जात आहेत. उभारण्यात येणाऱ्या पार्कचे दगड उखडून फेका… हे दगड काढून फेकण्यासाठी कोणते युवक तयार आहेत?,” असं सूरज पाल अमू म्हणाले.

“मला उज्जिना येथील सूरज पाल सिंह यांची आठवण येत आहे, ज्यांनी आपल्या गावात मशीद उभारू दिली नाही. एक तरुण मला सांगत होता की, भोडकलानमध्ये पुन्हा पुन्हा मशीद उभारण्यात येत आहे. ते हे थांबवतात. पण पुन्हा मशीद उभारली जाते. हे मूळापासूनच उखडून फेका,” असं भडकाऊ विधान सूरज पाल अमू यांनी महापंचायतीत बोलताना केलं. “जर देशात इतिहास घडवायची इच्छा असेल, तर इतिहास बनायचं नाहीये; इतिहास बनवायचा आहे. मग ना तैमूर जन्माला येईल, ना औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येईल. आपण शंभर कोटी आहोत आणि ते २० कोटी,” असं वक्तव्यही सूरज पाल अमू यांनी या पंचायतीत केलं.

‘पद्मावत’मुळे सापडले होते वादात

करणी सेनेचे अध्यक्ष असलेले सूरज पाल अमू २०१७ मध्ये पद्मावत सिनेमावरून निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. सूरज पाल अमू यांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा १० कोटी रुपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली होती. त्यावरून ते वादातही सापडले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suraj pal amu controversial remarks about muslim love jihad bjp spokesperson and karni sena president bmh

Next Story
भारतानेच हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट घडवल्याचा पाकिस्तानचा आरोप; इम्रान खान म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी