स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १३२ स्विस फ्रँक म्हणजेच १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. सोमवारी ही बाब सांगण्यात आली. या बँकेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे. शेअर आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्याने हा तोटा झाला आहे. या घटनेमुळे बाजारात तेजीत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्विस नॅशनल बँक या प्रकरणात ६ मार्चला तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे. स्विस फ्रँक कमकुवत झाला याची विविविध कारणं आहेत. स्विस बँकेने ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स यामध्येच १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. जागतिक शेअर बाजारात मंदी आली. त्यामुळे रोखीच्या किंमती गेल्या वर्षी घसरल्या. यामुळे स्विस नॅशनल बँकेसह सगळ्यात बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. मात्र हे देखील तोट्याच्या दिशेने घेऊन जाणारं कारण ठरलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiss national bank posts record 143 billion dollars loss in 2022 scj
First published on: 09-01-2023 at 18:30 IST