प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यास नकार दिलाय. बंगालच्या संगीत विश्वातून पुरस्कार मिळूनही तो नाकारणारे चॅटर्जी दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी २००२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी याआधीच राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलंय. १९८९ मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते.

पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडीत रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे. जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले, “मला मंगळवारी (२५ जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्विकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्विकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

“माझ्या कनिष्ठांना खूप वर्षांपूर्वीच हा पुरस्कार मिळाला”

“मला १० वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला असता तर मी आनंदाने स्विकारला असता. माझ्यासोबतचे आणि अगदी माझ्या कनिष्ठांना देखील खूप वर्षांपूर्वीच हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच मी माफी मागत खूप नम्रपणे हा पुरस्कार स्विकारू शकत नाही असं कळवलं,” अशी माहिती पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी दिली.

प्रसिद्ध गायक संध्या मुखर्जी यांच्याकडूनही पद्म पुरस्कार स्विकारण्यास नकार

प्रसिद्ध गायक संध्या मुखर्जी यांनी देखील पद्म पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला आहे. संध्या मुखर्जी यांची मुलगी म्हणाले, “जवळपास ८ दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यानंतर वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना यापेक्षा मोठा सन्मान मिळायला हवा.”

हेही वाचा : “मला पद्मभूषण नको…”; पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांनी नाकारला सन्मान

दरम्यान, पश्चिम बंगालमधून एकूण तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार स्विकारण्यास नकार दिलाय. चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या आधी सुरुवातीला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयचे (एम) नेते बुद्धादेब भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला होता.