इंटरनेटवरील ‘गुगल स्ट्रीट व्ह्य़ू’ ही सेवा वापरून जगभरातील प्रेक्षणीय स्थळांची आभासी सफर करणाऱ्या पर्यटकांमध्ये आग्रा येथील ताजमहाल लोकप्रिय असल्याची माहिती गुगलने दिली आहे.  भारतासह सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कोरिया, फिलिपीन्स, मलेशिया या देशांतील पर्यटकांनी ताजचे मोठय़ा प्रमाणात ‘व्हच्र्युअल’ दर्शन घेतले. यासह लाल किल्ला, कुतुब मिनार, आग्रा किल्ला, लवासा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, हुमायूनची कबर, शनिवार वाडा, जंतर मंतर, आयआयटी मुंबई या भारतातील स्थळांनाही पर्यटकांनी मोठी पसंती दिली. गेल्या वर्षी या आभासी पर्यटनामध्ये जपानमधील माऊंट फ्युजी लोकप्रिय होते.