तालिबानच्या वर्चस्वाखाली नसलेला अफगाणिस्तानातला शेवटचा प्रांत पंजशीरसाठीची लढाई शनिवारीही सुरू राहिली कारण तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान या दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. तालिबानने पंजशीर प्रांताची राजधानी बझारकमध्ये घुसल्याचा दावा केला आणि प्रांतीय गव्हर्नर कार्यालयावर हल्ला केला, तर नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानने सांगितले की तालिबानी दहशतवाद्यांना कपिसा प्रांत आणि पंजशीरच्या सीमेवर परत ढकलले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्वाका न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तालिबानने असा दावा केला आहे की त्यांनी पंजशीरच्या शुतुल जिल्ह्यावर कब्जा केल्यानंतर अनबा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितले की, खिंज आणि उनाबाह जिल्ह्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यामुळे तालिबानी सैन्याने प्रांताच्या सात जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांचे नियंत्रण मिळवले आहे.”मुजाहिद्दीन (तालिबान लढाऊ) केंद्र (प्रांताच्या) दिशेने पुढे जात आहेत,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा…

तालिबानच्या एका सूत्राने अल जझीराला सांगितले की, पंजशीरमध्ये लढाई सुरूच होती पण राजधानी बझारक आणि प्रांतीय गव्हर्नर कंपाऊंडच्या रस्त्यावर लँडमाईन्समुळे या लढ्याची गती मंदावली होती. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने म्हटले की त्यांनी खवाक पासमध्ये हजारो दहशतवाद्यांना वेढले आहे आणि तालिबानने दश्ते रेवक परिसरात वाहने आणि उपकरणे सोडून दिली आहेत. एका ट्वीटमध्ये, प्रतिकार शक्तींनी असा दावा केला आहे की, ७०० हून अधिक तालिबानी लढाऊ मारले गेले, ६०० पकडले गेले आणि कैद केले गेले. सोशल मीडियावर तालिबानचा काफिला पांढरा झेंडा घेऊन बाहेर जातानाचे व्हिडिओ देखील दिसू लागले. इराणचे पत्रकार ताजुदेन सोरेश यांनी शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओमध्ये लोक तालिबान पंजशीरमधून पळून जात असल्याचे पार्श्वभूमीवर म्हणताना ऐकले जाऊ शकते. मात्र, व्हिडिओची सत्यता पडताळता आली नाही.

शनिवारी रात्री उशिरा, राष्ट्रीय प्रतिरोध आघाडीने असेही म्हटले की, परियान जिल्ह्यात तीव्र लढाई सुरू आहे, जी रविवारी सकाळपर्यंत सुरू होती.पंजशीर हा राष्ट्रीय प्रतिरोध आघाडीचा बालेकिल्ला आहे, ज्याचे नेतृत्व अहमद मसूद, माजी अफगाणिस्तानचा गनिमी कावा अहमद शाह मसूद यांचे पुत्र आणि माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी केले आहे, ज्यांनी अशरफ गनी देश सोडून पळून गेल्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban resistance forces panjshir valley battle afghanistan vsk
First published on: 05-09-2021 at 10:11 IST