अमेरिकेन सैन्याची शेवटची तुकडी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तालिबानने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. २० वर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली आहे. अमेरिकेचं सैन्य बाहेर पडताच तालिबाननं काबूल विमानतळावर ताबा मिळवला. तसेच अमेरिकन सैन्यानं सोडलेली विमानं आणि चिनूक हेलिकॉप्टर ताब्यात घेतलं. यापूर्वी तालिबाननं १५ ऑगस्टला काबूलवर ताबा मिळवताच अफगाण सैन्याची शस्त्रे आणि उपकरणं जप्त केली होती. २००३ पासून अमेरिकने अफगाण सैन्याला ६,००,००० शस्त्रे पुरवली होती. त्यात एम-१६ असॉल्ट रायफल, १,६२,००० दळणवळण उपकरणं आणि १६ हजार नाईट व्हिजन गॉगलचा समावेश आहे.

तालिबानची हल्लेखोर गणवेशात विमानतळावर पोहोचले आणि तिथली पाहणी केली. यावेळी बॉडी आर्मर, नाईट व्हिजन गॉगल आणि बंदुकांसह सज्ज होते. त्यानंतर अमेरिकन सैन्याच्या चिनूक हेलिकॉप्टरची त्यांनी पाहणी केली. याबाबतचा एक व्हिडिओ पत्रकाराने ट्विटरवर शेअर केला आहे.

दुसरीकडे अमेरिकन लष्कराने अनेक हेलिकॉप्टर आणि चिलखती वाहनं काबूल विमानतळावर पोहोचण्यापूर्वी निकामी केल्याचं सांगितलं जात आहे. “काबूल विमानतळावर असलेली ७३ विमानं सैन्यविरहित करण्यात आली होती. तसेच ती विमानं निरुपयोगी ठरवली होती”, असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुखे जनरल केंथ मॅकेन्झी यांनी सांगितलं आहे. केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं. “अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची मी घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेलं मदतकार्य पूर्ण झालं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या सी -१७ विमान हे हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी उड्डाण केलं आहे.” असं मॅकन्झी म्हणालेत.

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडलं, २० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; बायडेन म्हणाले, “मागील १७ दिवसांमध्ये…”

चिनूक हेलिकॉप्टर वैशिष्ट्य वाचा
चिनूक हेलिकॉप्टर वजन उचलण्यास सक्षम आहे. चिनूक हेलिकॉप्टरमध्ये दोन रोटर इंजिन आहेत. पहिल्यांदा या हेलिकॉप्टरने १९६२ उड्डाण केलं होतं. त्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये अनेक अपडेट करण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरच्या मदतीने दुर्गम भागात सामग्री पोहोचवण्यास मदत होते.