सहकारी महिला पत्रकाराचा विनयभंग आणि लैंगिक हल्ला केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची चौकशी न करताच गोव्यातील पोलिसांचे पथक रविवारी नवी दिल्लीहून परतले. मात्र, या प्रकरणी त्यांनी तहलकाच्या तीन कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. पोलिसांनी तहलकाच्या कार्यालयातील हार्ड डिस्क व काही कागदपत्रे जप्त केल्याचेही समजते.
गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक सॅमी टॅवरिस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्लीतील गोवा सदन येथे रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून या तीन कर्मचाऱ्यांचा रविवारी जबाब घेतला. मात्र या पथकाने तेजपाल यांची चौकशी केली नाही. मंगळवारी हे पथक संबंधित महिला पत्रकाराचा मुंबईत जबाब घेईल व त्यानंतर तेजपाल यांची चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2013 रोजी प्रकाशित
तेजपाल यांची अटक लांबणीवर
सहकारी महिला पत्रकाराचा विनयभंग आणि लैंगिक हल्ला केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची चौकशी न करताच गोव्यातील
First published on: 25-11-2013 at 01:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case colleagues questioned back victims statement