‘तहलका’चे व्यवस्थापकीय संपादक तरुण तेजपाल यांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महिला सहकारी पत्रकारावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर आहे.
मुख्य महानगर दंडाधिकारी अनुजा प्रभुदेसाई यांनी, तेजपाल यांना सीसीटीव्ही फुटेजची प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश, न्यायालयातील कर्मचाऱ्यांना दिले. तेजपाल हे सध्या वॉस्कोतील कारागृहात असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्रात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून फुटेजचा समावेश केला आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने सीसीटीव्ही फुटेज दडवून ठेवल्याचा आरोप तेजपाल यांनी केला. सदर फुटेज उपलब्ध झाल्यास त्याद्वारे घटनाक्रमाचे अचूक वर्णन करता येणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. गोळा केलेले सर्व पुरावे आरोपपत्र दाखल करताना आरोपीला उपलब्ध करून न देणे हे योग्य प्रक्रियेचे उल्लंघन करण्याचा प्रकार आहे, असेही तेजपाल म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
तेजपालला सीसीटीव्ही फुटेजची प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश
‘तहलका’चे व्यवस्थापकीय संपादक तरुण तेजपाल यांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.
First published on: 20-02-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case court grants tarun tejpals demand for copy of hotel cctv footage