Telangana Election 2023: तेलंगणा राज्यात या वर्षाअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील निझामाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. या सभेमध्ये मोदी बोलताना म्हणाले, ”के. चंद्रशेखर राव यांनी मला सांगितले होते, देश तुमच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे. आम्हालाही एनडीएचा भाग व्हायचे आहे. आम्हाला एनडीएमध्ये सामावून घ्या. यावर मी त्यांना विचारले पुढे काय? तुम्ही हैदराबाद महापालिकेत आम्हाला पाठिंबा द्या. मी के. चंद्रशेखर राव यांना सांगितले, तुमचे कार्य असे आहे की मोदी तुमच्याबरोबर येऊ शकत नाहीत.” सभेत केलेल्या वक्तव्यावरून बीआरएस पक्षाचे केटी रामराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांना एनडीएमध्ये सामील करून घेण्याची विनंती केल्याच्या वक्तव्यावरून मंत्री केटी रामाराव यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींनी चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिल्या पाहिजेत असा टोला केटी रामाराव यांनी लगावला. ”पंतप्रधान मोदी एक उत्तम स्क्रिप्ट रायटर आणि कथाकार होऊ शकतील व ते कदाचित ऑस्कर देखील जिंकतील” असे केटी रामाराव म्हणाले. केटी रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत.

“मोदी खूप ज्ञानी व्यक्ती आहेत”, व्लादिमिर पुतिन यांची स्तुतिसुमनं; म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखाली भारत…”!

पुढे बोलताना केटी रामाराव म्हणाले, ”आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला आहे का? की आम्ही एनडीएमध्ये सहभागी होऊ. आज सर्व राजकीय पक्ष एनडीएची साथ सोडत आहेत. ज्यामध्ये शिवसेना, जेडीयू, शिरोमणी अकाली दल या पक्षांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटे वक्तव्य करून आपल्या पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. के. चंद्रशेखर राव हे असे एक योद्धा आहेत की त्यांना कधीही भाजपासारख्या पक्षाबरोबर काम करायला आवडणार नाही. आम्ही काही दिल्लीचे गुलाम नाही. तेलंगणामध्ये आम्ही दोन वेळा निवडणूक जिंकलो आहोत. आपण एकटे चांगले आहोत आणि बाकी सर्व जग हे भ्रष्ट आहे असे पंतप्रधानांना वाटते. ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत अशा नेत्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केल्याचे आपण पाहिले आहे ” असे बीएआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तेलंगणात १३,५०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात १३,५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. यामध्ये पंतप्रधान मोदींनी नागपूर-विजयवाडा या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या रस्ते प्रकल्पांची देखील पायाभरणी केली. या रस्ते प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 163G च्या वारंगल ते खम्ममपर्यंत १०८ किमी लांबीचा चौपदरी ग्रीनफिल्ड महामार्ग आणि खम्मम ते विजयवाडापर्यंत ९० किमीच्या चौपदरी ग्रीन फिल्ड महामार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वारंगल ते खम्मम आणि खम्मम ते विजयवाडा हे दोन्ही प्रकल्प सुमारे ६,४०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 163G वरील वारंगल ते खम्ममपर्यंत असणारा १०८ किमीचा ग्रीन फिल्ड या चौपदरी महामार्गामुळे या ठिकाणांमधील अंतर सुमारे १४ किमीने कमी होईल. तर खम्मम ते विजयवाडापर्यंत असलेल्या चौपदरी ग्रीन फिल्ड महामार्गमद्वारे या दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे २७ किमीने कमी करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.