कॅलिफोर्नियातील गोळीबारातील जोडप्याला दहशतवादी कृत्य करण्यासाठी कट्टरवादी बनवण्यात आले असावे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी सांगितले. अमेरिकेचे लोक यामुळे घाबरून जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितल्ऋे.
पाकिस्तानी- अमेरिकी नागरिक सय्यद रिझवान फारुक (२८) व त्याची पाकिस्तानी पत्नी तशफीन मलिक (२७) यांना सॅन बर्नार्डिनोतील हा भीषण हल्ला घडवून आणल्याचे एफबीआयने शोधून काढले आहे.