मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील विजयावरून उत्तर भारत किंवा हिंदी भाषक पट्टय़ात भाजपने आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरेत भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, कर्नाटकपाठोपाठ  तेलंगणातील विजयाने दक्षिण भारतात काँग्रेसची ताकद वाढली आहे.

 उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान., छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या २००च्या आसपास जागा आहेत. उत्तर भारतातील विजयाने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाल त्याचा फायदा होऊ शकेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदी पट्टय़ात भाजपला एकतर्फी यश मिळाले होते.

khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?
BJPs efforts to stop the Rebellion therefore aim for victory
विजयाचे लक्ष्य, म्हणून बंडखोरी थंड करण्याचे भाजपचे प्रयत्न
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेमुळे मुख्यमंत्री नितीशकुमार व लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. पण भाजपचे नेते मात्र बिहारबाबतही आशावादी आहेत.हिंदी भाषक पट्टय़ातील राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेसला गमवावी लागली. उत्तरेत हिमाचल प्रदेश या एकमेव छोटय़ा राज्याची सत्ता काँग्रेसकडे आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या १२८ जागा आहेत.

हेही वाचा >>>Chhattisgarh Election : भाजपाकडून छत्तीसगडमध्ये सत्तापालट, पाहा कोणते एग्झिट पोल खरे ठरले?

 दक्षिणेत केवळ काँग्रेस स्पर्धेत नसेल. कर्नाटकात २८ तर तेलंगणा १७ अशा लोकसभेच्या ४५ जागांवर काँग्रेससाठी वातावरण अनुकूल असेल. दक्षिणेत  डावे पक्ष, प्रादेशिक पक्ष स्पर्धेत असतील. भाजप स्वबळावर १२ राज्यांमध्ये सत्तेत मध्य प्रदेशची सत्ता राखतानाच राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमधील विजयांमुळे भाजप आता १२ राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत आहे. काँग्रेस ३ राज्यांत, तर आम आदमी पक्ष दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत आहे.

’भाजपची सत्ता असलेली राज्ये : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड

’चार राज्यांमध्ये भाजप आघाडीत सत्तेत : महाराष्ट्र, मेघालय, सिक्कीम आणि नागालॅण्ड

’काँग्रेस स्वबळावर सत्तेतील राज्ये : कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगण. बिहार आणि झारखंडमध्ये मित्र पक्षांबरोबर सत्तेत भागीदार

’आम आदमी पक्ष : पंजाब आणि दिल्ली