राजस्थानच्या विधानसभेमध्ये मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. कोटा शहरामध्ये कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय. ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय.

सोमवारी जिल्हाप्रशासनाने २२ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान जमावबंदीची घोषणा केली. गर्दी करणे, घोषणा देणे, आंदोलन करणं, मोर्चे काढण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात आलीय. मुख्यपणे कोटा शहरामध्ये चित्रपटगृहांची संख्या अधिक असल्याने तिथे या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिलं आहे. चित्रपट पाहण्यावर बंधी घालण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> “लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’साठी…”; विवेक अग्निहोत्रींचा मोठा खुलासा

भाजपाचे कोटामधील आमदार संदीप शर्मा यांनी शून्य प्रहरामध्ये यासंदर्भातील प्रश्न उपस्थित. “हा असा कसा आदेश आहे? हा चित्रपट देशभरामध्ये प्रदर्शित झालाय. जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम नाही का?,” असे प्रश्न उपस्थित केले. याला भाजपाच्या इतर आमदारांनी समर्थन करत सभागृहामध्ये गदारोळ केला. अध्यक्ष जे. पी. चंडीला यांनी यावेळी शांतता राखण्याचं आवाहन सभासदांना केलं. या प्रकरणी सरकारकडे विचारणा केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिलीय. दहशतवादी हे भीती निर्माण करुन अधिक सक्षम होतात आणि आपण त्यांना घाबरतो असं वक्तव्य अग्निहोत्री यांनी केलंय. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना टॅग करत अग्निहोत्री यांनी ट्विट केलंय. “अनुराग ठाकूर, स्वतंत्र देशामध्ये न्यायाच्या हक्काबद्दल बोलणाऱ्या चित्रपटावरच राज्याने बंदी घातलीय. असं असेल तर आपण न्यायाबद्दल काय बोलणार?, अशोक गेहलोत, दहशतवाद्यांची एकमेव ताकद ही आहे की ते भीती निर्माण करतात आणि आपण घाबरतो. ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रेक्षकांना आता तुमची वेळ आलीय न्याय करण्याची,” असं अग्निहोत्रींनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच ट्विटनंतर जिल्हा प्रशानसाने चित्रपटावर बंदी घालण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलंय.