Chandrayaan-3 Captures First Images Of The Moon : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता अपेक्षा अशी आहे की चांद्रयान ३ या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.

शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.

१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. याला ट्रान्सलुनर इंजेक्शन म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.

हे पण वाचा- चांद्रयान ३ चंद्राच्या आणखी जवळ पोहचलं, ९ ऑगस्टला पुढील कक्षेत प्रवेश करणार

चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधून काढणार आहे. चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- अवकाशाशी जडले नाते : चांद्रमोहिमांचे नवे पर्व

५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे. हे यान चंद्रावर उतरवण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरवणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा जगातील चौथा देश बनणार आहे. हा ऐतिहासिक विक्रम बनवण्यापासून भारत अवघं एक पाऊल दूर आहे.