प्रत्येक आईचे आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असते. आपल्या मुलांसाठी ती काहीही करू शकते. आईचे प्रेम आणि तिने आपल्या मुलांसाठी केलेला त्याग याची तुलना कशाशीही करता येणे कठीण आहे. मात्र मध्यप्रदेशात नुकतीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या आईला गरिबीमुळे एक कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील एका महिला काळजावर दगड ठेवून आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली. यावेळी तिने आपल्या मुलासह एक भावूक चिठ्ठीही ठेवली आहे. गरिबीमुळे तिला हा निर्णय घ्यावा लागल्याचं तिने यामध्ये म्हटलं आहे. या पत्रात तिने तिची परिस्थिती आणि मुलाचे पालनपोषण करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे. या महिलेने आपल्या मुलाला ग्वालियर-रतलाम एक्सप्रेसच्या एका डब्ब्यात सोडले. दरम्यान, या महिलेने जे पत्र लिहले आहे, ते वाचून तुम्हीही भावूक व्हाल.

सर्वांत आधी व्यायाम कोण करणार? क्षुल्लक कारणावरून जिममध्ये आपापसातच भिडल्या महिला; Video एकदा पाहाच

या महिलेने आपल्या पत्रात लिहलंय, “माझ्या पतीचे निधन झाले असून आम्हाला चार मुलं आहेत. माझे बाळ फक्त दूध पिते. मात्र, मी माझ्या मुलासाठी दूधही विकत घेऊ शकत नाही. कारण माझ्याकडे इतकेही पैसे नाहीत. माझ्यासाठी तीन मुलांचे पालनपोषण करणेच खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत मी या चौथ्या मुलाचा सांभाळ कसा करू? त्यामुळे नाईलाजाने मला याला इथे सोडून जावे लागत आहे. या मुलाला अनाथालयातही कोणी घेत नाही आहे. ज्यालाही हे पत्र मिळेल, त्यांना मी विनंती करते की त्यांनी माझा बाळाला अनाथालयात पोहोचवावे.”

अतिशहाणपणा नडला! सिंहाच्या पिल्लाला कुरवाळायला गेला अन् पिल्लाने चांगलाच धडा शिकवला; पाहा धक्कादायक Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या एकट्या मुलाला पाहून प्रवाशांनी लगेचच टीटीला याबद्दल माहिती दिली. यानंतर या मुलाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. ट्रेन ग्वालियर स्टेशनवर पोहोचताच चाईल्ड लाइन टीमला बोलावण्यात आले. दरम्यान अधिकाऱ्यांनी या मुलाला लहान मुलांच्या शिशु गृहात पाठवले असून त्याच्या आईचा शोध घेतला जात आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गुना स्टेशनवर ट्रेनमध्ये चढली होती. मात्र यानंतर ती कोणत्या स्टेशनवर उतरली याबाबत कोणालाही माहिती नाही. मुलाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तो मुकबधीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.