न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे न्यायालयात खटले अधिक काळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी खटले स्थगित ठेवण्याची संस्कृती बंद झाली पाहिजे, असे प्रतिपादन नवनियुक्त मुख्य न्यायाधीश आर एम लोढा यांनी सोमवारी केले.
ते पुढे म्हणाले की, खटले प्रंलबित ठेवण्याची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यायोगे प्रलंबित ठेवल्या जाणाऱ्या खटल्यांचा न्यायालयाच्या नियमित कामाला फटका बसू नये, यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वकिलांमार्फत खटले स्थगित ठेवण्याची ही संस्कृती नष्ट झाली पाहिजे आणि खटल्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.