scorecardresearch

भाजपाला हरवण्याची क्षमता समाजवादी पार्टीत नाही- असदुद्दीन ओवैसी

लोकसभा पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशमधील रामपूर आणि आझमगढ या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाचा विजय झाला आहे.

asaduddin-owaisi on utter Pradesh bypoll
संग्रहित

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानले जात होते. मात्र, भाजपाने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत आपला झेंडा फडवल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या या विजयनानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाला हरवण्याची ताकद समाजवादी पक्षात नाही, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

हेही वाचा- Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला भाजपाचा सुरुंग

देशामधील सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्या पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये रामपूर आणि आझमगढ या दोन्ही जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. अखिलेश यादव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआ यांचा पराभव करून आझमगढ मतदारसंघ जिंकला होता. रामपूर मतदारसंघात सपाचे आमदार असीम राजा यांचा पराभव करत भाजपा उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी विजय मिळवला आहे. तर समाजवादीचे आझम खान यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रामपूर मतदारसंघातही भाजपाने आपला झेंडा फडकवला.

हेही वाचा- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

मुस्लिमांना त्यांची राजकीय ओळख बनवावी लागेल
एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील दोन्ही लोकसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर निराशा व्यक्त करताना म्हटले आहे की, “रामपूर आणि आझमगड निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्टपणे दिसून येते की समाजवादी पक्षाकडे आता भाजपाला पराभूत करण्याची ताकद नाही. अशा परिस्थितीत मुस्लिमांनी आपली राजकीय ओळख बनवावी. समाजवादी पक्षासारख्या निरुपयोगी पक्षावर आपली अमूल्य मते वाया घालवू नयेत.

आझमगडमध्ये तिरंगी लढत
आझमगड लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळाली. भाजपा, समाजवादी पक्ष आणि बसपा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना अडीच लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. आझमगडमध्ये भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआ यांना २,९९,९६८ मते मिळाली, तर सपा उमेदवार धर्मेंद्र यादव यांना २,९०,८३५ मते मिळाली. तर, बसपचे शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांना २,५७,५७२ मते मिळाली आहेत. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघात भाजपाने सहज विजय मिळवला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The samajwadi party does not have the capacity to defeat the bjp said asaduddin owaisi after up bypolls dpj

ताज्या बातम्या