सध्या भारतातील सर्वच राज्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतात तर पारा नेहमीपेक्षा अधिक वर गेलेला दिसत आहे. रात्रीही उकाडा असह्य झाल्यामुळे अनेकांची झोप पुरी होत नाहीये. चोरांनाही अपुऱ्या झोपेचा त्रास जाणवत असावा. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका चोराला विचित्र परिस्थितीत अटक करण्यात आली आहे. एका बंद खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरलेला हा चोर एसी चालू करून फसला आणि अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नेमके प्रकरण काय घडले? ते पाहू.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, शनिवारी रात्री गाझीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लखनौच्या इंदिरा नगर, सेक्टर २० मध्ये हा प्रकार घडला. डॉ. सुनील पांडे यांच्या मोकळ्या घरात चोराने प्रवेश केला. पांडे सध्या वाराणसी येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्यामुळे लखनौमधील त्यांचे घर मोकळे होते.

माध्यम सम्राट, अब्जाधीश रुपर्ट मरडॉक यांनी ९३ वर्षी केलं पाचवं लग्न

मोकळे घर पाहून चोराने कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू गोळा केल्यानंतर चोराने एसी सुरू केला आणि थोडा वेळ तिथेच पडला. मात्र त्याला थंड हवेमुळे गाढ झोप लागली. दरम्यान पांडे यांच्या दाराचे कुलूप तोडल्याचे शेजाऱ्यांनी सकाळी पाहिले. तसेच घरात डोकावून पाहिले असता आतील वस्तू अस्ताव्यस्त केलेल्या दिसत होत्या. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कपिल नावाच्या चोराला झोपेतच पकडले. चोरलेल्या वस्तू आजूबाजूला ठेवून चोर शांतपणे झोपला होता. पोलिसांनी त्याच्यावर कलम ३७९ अ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, चोराने घरातील कपाट फोडले होते. कपाटातील मौल्यवान वस्तूंहस त्याने रोख रक्कमही चोरली होती. तसेच वॉशबेसिन, गॅस सिलिंडर आणि पाण्याचा पंप चोरण्याचाही प्रयत्न त्याने केला. मात्र त्याआधीच त्याला झोप लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी पुढे सांगितले की, चोराला गाढ झोप लागली होती. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नव्हता. रात्री मद्यपान केल्यामुळे त्याला झोप लागली होती, असेही पोलिसांनी सांगितले. पांडे यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, डॉ. पांडे यांचे वडील या घरात राहत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हे घर बंद आहे. डॉ. पांडे आपल्या कुटुंबासह वाराणसी येथे राहतात, ते अधूनमधून या घरी येत असतात.”