भाजपा खासदार आणि ग्वालियरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतीरादित्य शिंदे यांच्या महालात दरोडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये काही दरोडेखोर घुसले होते. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून दरोडेखोरांनी महालामधील राणी महालमध्ये घुसखोरी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी स्निफर डॉगही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महालात नेमके किती दरोडेखोर शिरले होते आणि काय सामान चोरी गेलं आहे याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदेंचा राजेशाही थाट: २० कोटी डॉलर्सचा राजमहाल, ४०० खोल्या, ३५०० किलोचे झुंबर

ग्वालियरचे शहर पोलीस अधीक्षक रतनेश तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बरंच नुकसान केलं आहे. पोलीस याप्रकरणी महालामधील कर्मचाऱ्यांचीदेखील चौकशी करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves break into bjp mp jyotiraditya scindia palace in gwalior sgy
First published on: 18-03-2021 at 10:44 IST