टायटॅनिक या जहाजाबद्दल कोणाला माहिती नाही? समुद्रात बुडालेल्या या जहाजाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. या घटनेवर आधारित टायटॅनिक हा हॉलिवूडपटही खूप लोकप्रिय आहे. टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वात आधुनिक आणि मोठं जहाज होतं, जे आटलांटिंक महासागरात बुडालं. पाण्याखाली तब्बल ३८०० मीटर खोल हे जहाज आहे असं सांगितलं जातं. हे जहाज बुडालं असलं तरी त्याबद्दल संपूर्ण जगाला खूप कुतूहल आहे. पाण्याखाली असलेल्या या जहाजाचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी गेलेली एक पाणबुडी उत्तर आटलांटिंक समुद्रात हरवली आहे. काही जण दावा करू लागले आहेत की, ही पाणबुडीदेखील बुडाली असावी.

ही पाणबुडी पाच पर्यटकांना घेऊन जात होती. टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी जात असलेली ही पाणबुडी हरवली आहे. रविवारपासून या पाणबुडीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता ही पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकन तटरक्षक दलाकडून ही पाणबुडी शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु बचाव पथकासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे लवकरात लवकर ती पाणबुडी शोधायला हवी कारण. त्या पाणबुडीत केवळ ६८ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन बाकी आहे.

ही पाणबुडी ओशियनगेट एक्पीडिशन्सकडून ऑपरेट केली जाते. ही कंपनी खोल समुद्रात अनेक मोहिमा राबवते. टायटॅनिक जहाज १९१२ मध्ये हिमनगाला धडकल्याने बुडालं होतं. समुद्राखाली असलेल्या टायटॅनिकच्या अवशेषांबद्दल पर्यटकांना खूप कुतूहल असतं. हे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक कंपनीला पैसे देऊन त्यांच्या पाणबुडीने समुद्राच्या तळाशी जातात आणि टायटॅनिकचे अवशेष पाहतात. या आठ दिवसांच्या टूरसाठी अडीच लाख डॉलर्स खर्च करावे लागतात.

हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंचं बंड ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा; ‘त्या’ नऊ दिवसांत काय काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पाणबुडीत सध्या ५ व्यक्ती आहेत. यात एक पायलट, तीन पर्यटक आणि एक कंटेंट एक्सपर्ट आहे. दरम्यान ही पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिकेसह, कॅनडाच्या नौदलांनी बचाव मोहिमा सुरू केल्या आहेत.