तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पश्चिम बंगालमधील दमदम येथील स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘वंदे मातरम, जय हिंद व जय बांग्ला’ असे लिहिलेली दहा हजार टपाल पत्र पाठवली आहेत.
WB: TMC worker &locals of Dum Dum send 10000 postcards to PM Modi, after writing Vande Mataram, Jai Hind&Jai Bangla on them. D Banerjee, council of south Dum Dum Municipality chairman says "We wanted to show what's in minds of people. We don't want to go&shout before his vehicle" pic.twitter.com/UlDU7LZOSW
— ANI (@ANI) June 4, 2019
तृणमुल काँग्रेस व भाजपा यांच्यात सुरू असलेले राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अधिकच वाढताना दिसत आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’ घोषणा दिल्याने मागिल काही दिवसांपुर्वी भडकलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटर व फेसबुकवरील आपला डीपा बदला आहे. त्यांच्या डीपीवर आता ‘जय हिंद, जय बांग्ला’ लिहिलेले दिसत आहे. ममता यांच्याबरोबरच त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देखील आपला डीपी बदलला आहे. आता यानंतर मंगळवारी टीएमसी कार्यकर्त्यांनी व दमदम येथील स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा हजार टपाल पत्रक पाठवली आहेत. ज्यात वंदे मातरम, जय हिंद व जय बांग्ला असे लिहिलेले आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी भाटपारा येथुन जात असताना काही जणांनी जय श्रीराम असे नारे दिल्यानंतर ममता कमालीच्या चिडल्या होत्या. एवढेच नाहीतर यामुळे भडकलेल्या ममतांनी गाडी बाहेर येत आपल्या सुरक्षा रक्षकांना या लोकांची नाव लिहुन घेण्यासही सांगितले होते. तसेच, त्यांनी यावेळी या लोकांना उद्देशुन हे देखील म्हटल्याचे बोलल्या जाता आहे की, तुम्हाला काय वाटत? तुम्ही परराज्यातुन याल, इथे राहाल व आमच्याबरोबर चुकीचा वर्तवणुक कराल. मी हे सहन करणार नाही. तुमची हिम्मतच कशी झाली मला अपमानित करण्याची? तुमच्या सगळ्यांची नावे व पत्ते लिहुन घेतली जातील.असे म्हणुन ममता गाडीत बसताच त्या लोकांनी पुन्हा जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, त्यामुळे त्या पुन्हा एकदा गाडी बाहेर आल्या होत्या.
तत्पुर्वी भाजपाकडून मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेली दहा लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंगालमधील भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह यांनी याबाबत सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी दहा लाख टपाल पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, या पत्रकांवर ‘जय श्री राम’ असे लिहिलेले असेल. घोषणा दिल्याने ममता भडकल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षाचे म्हणने आहे.