विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडिया यांच्या चुलत भावासह तिघांची शनिवारी सुरतमध्ये हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
सुरतमधील वराछा भागात प्रवीण तोगडिया यांचे चुलत भाऊ भरत तोगडिया यांच्यासह तिघांची शनिवारी रात्री आठच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या तिघांचे मृतदेह भरत तोगडियांच्या मित्राच्या कार्यालयाच्या परिसरातच मिळाले. या हत्याकांडाबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत असून, वराछा भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2016 रोजी प्रकाशित
विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या भावासह तिघांची हत्या
भरत तोगडिया यांच्यासह तिघांची शनिवारी रात्री आठच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 15-05-2016 at 12:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Togadias cousin 2 others stabbed to death in surat