१. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. १८ फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या तर ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करून दिलं आहे. वाचा सविस्तर :
२.भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानला नाही- पंतप्रधान मोदी
नद्यांमधील भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानत जाऊ दिले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणातील चरखी दादरी मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले. पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांमधील पाण्याचा प्रत्येक थेंब देशातील शेतकऱ्यांना दिला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली आहे, असेही मोदी म्हणाले. वाचा सविस्तर :
३. हितसंबंधांच्या जोखडातून माजी क्रिकेटपटूंची मुक्तता?
माजी क्रिकेटपटू लवकरच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळू शकणार आहेत. कारण परस्पर हितसंबंधांचे चक्रव्यूह त्यांना भेदता येणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने या संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. वाचा सविस्तर :
४.बॉलिवूडमधील ‘या’ दोन अभिनेत्यांना करायचे होते हेमा मालिनींसोबत लग्न
बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लव्ह स्टोरीपासून ते लग्नापर्यंतचा सारा प्रवास चाहत्यांना माहित आहे. परंतु त्याकाळी बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होते, ज्यांना हेमा मालिनींसोबत लग्न करायचे होते. वाचा सविस्तर :
५. ‘या’ खास फीचरमुळे भारतात लाँच होणार नाही Google Pixel 4
Google ने आपल्या हार्डवेअर इव्हेंट Made by Google दरम्यान आपले नवे Pixel 4 आणि Pixel 4 XL हे स्मार्टफोन्स लाँच केले. यावेळी Project Soli वर कंपनीने विशेषत: लक्ष दिलं होतं. तसंच रडार सेन्सरचा वापर करण्यात आलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये सर्वात जलद गतीचं फेस अनलॉक फिचर देण्यात आल्याच्या दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :
