दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी फौजी भाई ऊर्फ अब्दुल रेहमानचा खात्मा केला. मसूद अझहर आणि त्याच्या जैश-ए-मोहम्मदसाठी हा मोठा झटका आहे. कारण अब्दुल रेहमान बॉम्ब बनवण्यामध्ये मास्टर होता. बुधवारी पहाटे सुरु झालेल्या या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. भारतीय सुरक्षा यंत्रणा या फौजी भाई ऊर्फ इस्माइलच्या मागावर होत्या. पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे २७ मे रोजी कार बॉम्ब प्रकरणाशी तो संबंधित होता. “मूळचा पाकिस्तानी असलेल्या या अब्दुल रेहमानने तीन कारमध्ये आईडी स्फोटके भरल्याची माहिती आहे. त्यातली एक कार २७ मे रोजी आम्ही जप्त केली. पण अजून दोन कारबद्दल समजू शकलेले नाही. बडगाम, कुलगाममध्ये कुठेतरी या गाडया असू शकतात” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.

आणखी वाचा- सैन्याचं मोठं यश! एकाचवेळी जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७ मे रोजी सुरक्षा दलांनी स्फोटकांनी भरलेली सेंट्रो कार जप्त केली. जैशचा दहशतवादी समीर अहमद दारकडे ही कार नेत असताना जप्त करण्यात आली. समीर अहमद दार हा आदिल दारचा नातेवाईक आहे. याच आदिल दारने मागच्यावर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या बसला धडकवली होती. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.