माउंट एव्हरेस्टची भव्यता सर्वाच्याच साहसाला साद घालणारी पण सगळेच अशी साहसे करू शकत नाहीत. त्यामुळे गुगल मॅपने आता त्यांच्या ऑनलाइन मॅप सव्‍‌र्हिसमध्ये माउंट एव्हरेस्टची चित्रे समाविष्ट केली आहेत. आभासी साहसे करण्यास येथे मुबलक वाव आहे. गुगलच्या स्ट्रीट व्ह्य़ू टीमने टिपलेल्या छायाचित्रांमुळे दक्षिण अमेरिकेतील अकॉनकागुआ, आफ्रिकेतील किलिमांजारो, युरोपातील माउंट एलब्रस, नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट या पर्वतांवर गिर्यारोहण करण्याचा आभासी आनंद यात घेता येणार आहे.
साहसाचा आनंद
गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही स्वत:ला या पर्वतशिखरांवर घेऊन जाऊ शकता , तेथे बर्फवृष्टी असली , दरडी कोसळल्या असल्या बरेच धोके असले तरी तुम्ही मात्र तिथे सफाईदारपणे पोहोचलेला असाल. पृथ्वीवरील सात पर्वतशिखरांचा वेध तुम्ही यात घेऊ शकाल.
शिखरांची उंची
माउंट एव्हरेस्ट
 बेस कँप -१७५९८ फूट
माउंट एलब्रस , रशिया- १८,५१० फूट
माउंट अकॉनकाग्वा, अर्जेटिना- २२८४१ फूट
माउंट किलीमांजारो, टांझानिया, १९३४१ फूट
छायाचित्रे गुगल टीमने कशी घेतली?
गुगल मॅपवर जी छायाचित्रे वापरलेली आहेत ती ट्रायपॉडवर लावलेल्या  डिजिटल कॅमेऱ्याने काढलेली आहेत या कॅमेऱ्याला फिशआय लेन्स असल्याने ३६० अंशातून प्रत्येक दृश्य टिपले आहे. स्ट्रीट व्ह्य़ू टीमने अनेक शहरात अक्षरश: चालत, सायकलने जात छायाचित्रे टिपली आहेत, त्यांचा समावेश ऑनलाईन मॅपमध्ये करण्यात आला आहे. गुगलने त्यांच्या गुगल मॅपमध्ये कॅनेडियन आक्र्टिकमधील नुनावुट  समुदाय तसेच ब्राझीलमधील अ‍ॅमेझान काही छायाचित्रे समाविष्ट केली आहेत.ही छायाचित्रे घेणारे कुणी हौशी छायाचित्रकार नव्हते तर गुगलचे कर्मचारी होते.
जगातील अत्यंत उंचीवरच्या या पर्वतशिखरांचा वेध तुम्हाला आता आरामखुर्चीत बसूनही घेता येणार आहे, अतिशय विलोभनीय अशी ही चित्रे निश्चितच तुम्हाला आनंद देतील.
डॅन फ्रेडिनबर्ग,  गुगल अ‍ॅडव्हेंचरर