त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला राहुल गांधीच जबाबदार असल्याचं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईशान्येतील राज्यांवर बहिष्कार घातल्याचा आरोप केला आहे. ईशान्य भारतात राहुल गांधींचे अज्ञान हे पक्ष नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते, ज्यात भारत एक संघ आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणाले की ते ईशान्येकडील राज्यांना विसरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आपल्या ट्विटमध्ये ईशान्येकडील प्रदेशाचा उल्लेख न केल्याबद्दल गांधींवर टीका केली होती.
त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणाले, की राहुल गांधींनी त्यांचे पणजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच या प्रदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “राहुल गांधी आमच्या ईशान्येकडील सुंदर राज्यांना प्रचारासाठी विसरले आहेत. त्यांच्या पणजोबांप्रमाणे त्यांनी आमच्या प्रदेशावर बहिष्कार टाकला का? आम्ही देखील भारताचा अभिमानास्पद भाग आहोत. ईशान्येतून काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे.”
दरम्यान, राहुल गांधींवर निशाणा साधत आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, “भारत फक्त एकसंघाच्या पलीकडे आहे.” त्याचवेळी त्यांनी राहुल गांधींना ‘राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयता’शी तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल केला आणि “भारताला बंधक बनवता येणार नाही”, असंही सरमा यांनी म्हटलं.
राहुल गांधींना ईशान्येतील राज्यांचा विसर पडला असून ते आणि त्यांचा पक्ष गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंत पसरला आहे, असं म्हणत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.