मिडल ईस्टमधला संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगभरातले नेते चर्चा करत आहेत. दरम्यान तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तंबाखू विरोधी मोहीमेत बोलत असताना जॉर्जिया मेलोनी यांना धूम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही दिसायला सुंदर आहात, मात्र तुमही धूम्रपान सोडलं पाहिजे असं आवाहन मी तुम्हाला करतो असं एर्दोगन यांनी मेलोनी यांना उद्देशून म्हटलं आहे. मी तुम्हाला तुमची धु्म्रपानाची सवय कशी सोडता येईल यासाठीचा मार्ग शोधण्यास मदत करेन असंही आश्वासन दिलं आहे.

काय म्हणाले एर्दोगन?

मेलोनी, मी तुम्हाला विमानातून उतरत असताना पाहिलं. तुम्ही खूप सुंदर दिसता पण तुम्ही धूम्रपान सोडलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला यासाठी जी मदत हवी असेल ती मी करायला तयार आहे. एर्दोगन यांनी जॉर्जिया मेलोनी यांना विमानातून उतरताना जे पाहिलं ते फुटेज Ihlas या न्यूज एजन्सीने प्रसारित केलं होतं. दरम्यान एर्दोगन यांनी जेव्हा हे विधान केलं तेव्हा फ्रान्सचे अद्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे त्यांच्या शेजारीच उभे होते. त्यांनी हे विधान ऐकलं आणि ते हसून म्हणाले तुम्ही जे म्हणत आहात ते जवळपास अशक्य आहे. त्यावर मेलोनी लगेच म्हणाल्या होय मला माझी धूम्रपानाची सवय सोडायची आहे. मला त्याची कल्पना आहे.

जॉर्जिया मेलोनी यांचं धूम्रपानाबाबत काय मत?

दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमांवरील आधारित पुस्तकात असं म्हटलं आहे की धूम्रपान केल्याने जगताल्या नेत्यांसह मला बॉडिंग करता आलं. आता तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी मेलोनी यांना धूम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर मी तुर्किये धु्म्रपान मुक्त कसा होईल या विषयावर लक्ष केंद्रीत करतो आहे. धूम्रपान विरहित तुर्किये अभियान आपण सुरु करत आहोत असंही एर्दोगन यांनी म्हटलं आहे.

इजिप्तमध्ये खास परिषदेचं आयोजन

इजिप्त या देशात एक खास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत एर्दोगन आणि मेलोनी यांच्यासह इतर जागतिक नेत्यांची उपस्थिती आहे. इजिप्तच्या रेड सी रिसॉर्ट या ठिकाणी ही परिषद पार पडते आहे. शार्म एल शेख या शहरात हे रिसॉर्ट आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला आहे. वैश्विक शांततेच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली. दरम्यान एर्दोगन यांनी मेलोनी यांना जे आवाहन केलं त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.