ट्विटरमधील नोकरकपात त्यानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुरू झालेले राजीनामासत्र पाहता ट्विटरच्या भवितव्याबाबत काही युजर्संकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही मायक्रो ब्लॉगिंग साईट टिकणार नाही, असा कयास काही युजर्सकडून बांधला जात आहे. या टीकाकारांना एलॉन मस्क यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ट्विटरने आत्तापर्यंत संपायला नको होतं का?” असा उलट सवाल करत अनेक उलथापालथीनंतरही कंपनी टिकून असल्याचं अप्रत्यक्षरित्या मस्क यांनी ठासून सांगितलं आहे.

Elon Musk: ट्विटरकडून नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर, “बोलण्याचं स्वातंत्र्य असेल पण…”, एलॉन मस्क यांचं ट्वीट

‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी हात जोडून टीकाकारांना दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आज पुन्हा टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. हात जोडलेला इमोजी वापरून हिंदीत ‘नमस्ते’ असं ट्वीट मस्क यांनी केलं होतं. ट्विटर खरेदी करताच मस्क यांनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे.

Donald Trump: २२ महिन्यांनंतर ट्विटर खातं पुन्हा सुरू झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “ट्विटरवर परतण्याचं…”

दरम्यान, बऱ्याच देशांमध्ये #RIPTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी कामावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर हा सोशल मीडिया प्लॅटफार्म वापरण्यासाठी सुरक्षित आहे का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ट्विटरचे माजी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी लीया किस्नर, मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन किरन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आधीच कंपनी सोडून गेले आहेत.

Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्कने १३ किलो वजन केले कमी, ‘ही’ पद्धत स्वीकारुन केला चमत्कार! मस्कने केलाय ट्विटरवर खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.