2 Assam Rifles personnel killed, 4 injured in Manipur ambush : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शु्क्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी ३३ आसाम रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर घातपाती हल्ला केल्याची आल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात दोन जवान ठार झाले आहेत तर चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी सुमारे ५ वाजून ४० मिनिटांनी झाली. जवानांना घेऊन जात असलेल्या ट्रकवर नांबोल सबल लेइकै (Nambol Sabal Leikai) येथे हल्ला करण्यात आला. हलाला झाला ते ठिकाण इम्फाल विमानतळापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे.
२१ सप्टेंबर १९४९ रोजी झालेल्या मणिपूर विलीनीकरण कराराला विरोध म्हणून या खोऱ्यातील दहशतवादी गटांनी पुकारलेल्या बंदच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दलावर झालेला हा पहिलाच प्राणघातक हल्ला आहे. यापूर्वी अशी घटना गेल्या वर्षी आसामच्या सीमा भागातील कछार जिल्ह्याला लागून असलेल्या जिरिबाम जिल्ह्यात घडली होती. या हल्ल्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला होता आणि तीन इतर जवान जखमी झाले होते.