नवी दिल्ली : अबुधाबीमध्ये सोमवारी झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या दोन भारतीयांची ओळख पटली असून त्यांचे पार्थिव भारतात पाठविले जाणार आहे, अशी माहिती संयुक्त अरब अमिराती(यूएई )मधील भारतीय दूतावासातर्फे मंगळवारी देण्यात आली. 

सोमवारच्या घटनेत सहा जण जखमी झाले असूून त्यातील दोघे भारतीय आहेत. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना सोमवारी रात्रीच घरी पाठविण्यात आले, असेही भारतीय दूतावासाने ट्विटरवर स्पष्ट केले आहे. याच घटनेत एका पाकिस्तानी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. ठार झालेल्या दोन भारतीयांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर पाठविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूएईमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय असून तेथील परदेशी नागरिकांत ही संख्या सर्वाधिक आहे. अबुधाबीत एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के, तर यूएईत ३० टक्के भारतीय आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासातर्फे देण्यात आली.