two people killed as On Camera Plane crashed on highway in Italy Video : इटली येथे एक विमान कोसळल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. येथे एक लहान विमान अगदी वर्दळीच्या रस्त्यावर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना मंगळवारी घडली. विमान कोसळल्याबरोबर याचा भीषण स्फोच झाला. या दुर्घटनेत ७५ वर्षीय पायलट आणि ६० वर्षीय प्रवासी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी उत्तर इटलीमध्ये ब्रेशिया (Brescia) येथील महामार्गावर हे विमान कोसळले. मिलानमधील ७५ वर्षीय वकील आणि पायलट सर्जियो रवाग्लिया आणि ६० वर्षीय अॅन मारिया डी स्टेफानो अशी मृतांची नावे आहेत.

नेमकं काय झालं?

व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, फ्रेसिया आरजी अल्ट्रालाइट एअरक्राफ्ट थेट ब्रेशिया हायवेवर आपटलं, यानंतर मोठी आगडोंब उसळला आणि परिसरात काळा धूर पसरला. हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यामध्ये अत्यंत वेगाने विमान जमिनीवर आपटताना आणि त्याचा स्फोट होताना पाहायला मिळत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रवाग्लिया हे महामार्गावर आपत्कालिन लँडिंग करण्याचा प्रयत्न कत होते, पण ते विमानावर नियंत्रण मिळवू शकले नाही, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. एनडीटीव्हीने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.

विमान कोसळून झालेल्या स्फोटामुळे दोन दुचाकी चालक जखमी झाले, पण त्यांचा जीव वाचला आहे. सुदैवाने विमान दुसऱ्या कोणत्या वाहनावर कोसळले नाही, अन्यथा आणखी लोकांचा जीव गेला असता.

आपत्कालीन मदत करणारी पथके घटनास्थळी तातडीने दाखल झाली पण वाचवण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. कार्बन फायबरपासून बनवलेले आणि अंदाजे ३० फूट लांब पंख असलेले इटालियन बनावटीचे अल्ट्रालाईट फ्रेशिया आरजी हे विमान आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघाताच्या तपासात मदत करण्यासाठी इटलीची नॅशनल एजंसी फॉर फ्लाइट सेफ्टी ही एक कंसल्टंट ब्रेशिया येथे पाठवत आहे. तर ब्रेशिया प्रॉसिक्यूटर्स ऑफिसने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.