संयुक्त अरब अमिरातीने सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षासाठी पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना व्यावसायिक होण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २ जानेवारी २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही पगारी सुट्टी उपलब्ध होणार आहे.

सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरीकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘Khaleej Times’ ने याबाबत माहिती दिली आहे. दुबईचे रुलर शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, उपाध्यक्ष आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील नागरिकांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन नियमानुसार संयुक्त अरब अमिरातीमधील जे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांना त्यांच्या पगाराच्या किंमतीमधील अर्धी किंमत या काळात मिळणार आहे. याचा कालावधी एक वर्षाचा असेल. ते कर्मचारी जिथे काम करत आहेत तेथील फेडरल ऑथॉरिटीकडुन या सुट्टीची परवानगी देण्यात येईल.