UBER जगातील सर्वात प्रसिद्ध कंपनी आहे. जगभरात या कंपनीचे जाळे जगभरात पसरले आहे. अशे खुप कमी लोक असतील ज्यांनी UBER ची सर्व्हीस घेतली नसेल. पण विश्वास होणार नाही असे वृत्त समोर आले आहे. चक्क UBER CEO दारा खोसरोशाही यांनी Uber Eats app वापरत अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये दिवसभर फूड डिलिव्हरीचे काम केले. त्यांना यासाठी सुमारे १०० डॉलर्स मिळाले. याबाबत दारा खोसरोशाही यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे ते जगभरात चर्चेत आले आहेत.

दारा खोसरोशाही यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. आपला अनुभव शेअर करत ते म्हणाले, “UberEats साठी डिलिव्हरी करतांना काही वेळ घालवला. १) सॅन फ्रान्सिस्को खरोखर एक सुंदर शहर आहे. २) रेस्टॉरंट मधील कर्मचारी खूपच छान होते. ३) ३:३० पर्यंत ऑनलाइन राहत ३:२४ पर्यंत डिलिव्हरी करण्याचा वेळ खूप व्यस्त होता. आता माला भुक लागली असून काही ऑर्डर करण्याची वेळ आली आहे.”

खोसरोशाही यांनी ट्विटरवर सायकलसह एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. विशेष म्हणजे एका नेटकऱ्यांनी त्यांना दिवसभरातील ट्रिपचे डिटेल्स मागितले. तर त्यांनी दुसरा एक फोटो शेअर केला ज्यावरून कळते की त्यांनी प्रत्येक ऑर्डरवर ६ ते २३ डॉलर्स कमावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या ट्विटरवर खोसरोशाही यांनी दुसऱ्या दिवसाच्या अनुभव सांगितला. ते म्हणाले, “दुसरा दिवस पहिल्या दिवसासारखा चांगला नव्हता. तसेच खूप टॅफिक सुद्धा होते. ज्यास्त फास्ट फूड आणि कमी टिप्स मिळाल्या.” यासह त्यांनी दोन फोटो शेअर केले. ज्यामध्ये त्यांच्या एका दिवसाच्या कमाईचा तपशील आहे. यात दारा खोसरोशाहीने एकूण ५०.६३ डॉलर (सुमारे ३७५६ रुपये) कमावले आणि ६ ट्रिप पूर्ण केल्या. यासह त्यांना एकूण १८ पॉइंट्स मिळाले.