scorecardresearch

“गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”; पाकिस्तानची ब्रिटन पोलिसांकडे मागणी

ब्रिटनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या युनिटला तथाकथित पुरावे सादर करण्यात आले आहेत

amit shah Manoj Mukund Naravane

पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कारवाया सुरुच आहेत. ज्या ज्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला बोलण्याची संधी मिळते, तिथे भारताविरुद्ध सातत्याने खोटा प्रचार केला आहे. सध्या पाकिस्तानचा भारतीय लष्कराबाबत पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटन पोलिसांना जम्मू-काश्मीरमधील गुन्ह्यांसाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीने कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरीकांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील कथित भूमिकेबद्दल भारतीय लष्करप्रमुख, गृहमंत्री यांच्यासह आणखी आठ उच्च लष्करी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या युद्ध गुन्हे युनिटला तथाकथित पुरावे सादर केले आहेत.

या कायदे कंपनीचा अहवाल २०२० ते २०२१ दरम्यान २००० हून अधिक पुराव्यांवर आधारित आहे आणि पोलिसांकडे अर्ज लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी झिया मुस्तफाने केला आहे. लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी झिया मुस्तफा याने स्वातंत्र्यसैनिक असल्याचे वर्णन करत, तपास अहवालात कलम ३७० रद्द करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.

कोण आहे झिया मुस्तफा?

झिया नदीमार्ग हत्याकांडाचा सूत्रधार आहे. या हत्याकांडात २४ काश्मिरी पंडित मारले गेले होते. लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर असताना झियाला २००३ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

खलील दिवाण यांनी तयार केलेल्या या अहवालात एका काश्मिरी व्यक्तीचा दोन इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांनी छळ केल्याचा दावा केला आहे. पीडितेने एसडब्ल्यूआय-युनिटला सांगितले की, चौकशी करणारे भारतीय वंशाचे नव्हते. तो अमेरिकन भाषेत बोलत होता. त्यांना परराष्ट्रविषयक माझे मत जाणून घ्यायचे होते आणि त्यांना काश्मीर संघर्षात रस नव्हता.

४० पानांच्या अहवालात टी-२० क्रिकेट विश्वचषकात भारतावर पाकिस्तानच्या विजयाचे समर्थन केल्याबद्दल काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक केल्याचाही उल्लेख आहे. यामध्ये भारताने इस्रायली संरक्षण दलाकडून चार हेरॉन ड्रोन आणि अमेरिकेकडून एमक्यू-१ प्रीडेटर घेणार असल्याची चर्चा आहे असे नमूद करण्यात आले आहे. याचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये पाळत ठेवण्याच्या मोहिमांसाठी केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uk police received request to arrest indian army chief general manoj mukund naravane and union home minister amit shah over crimes in jk abn

ताज्या बातम्या