scorecardresearch

Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! चेर्नोबीलमधून रशियन सैन्य माघारी; अचानक पळ काढण्यामागील कारणाबद्दल गूढ कायम

चार मार्च रोजी रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये चर्नोबिल अणुभट्टीत आग लावण्यात आली होती.

chernobyl
रशियाने आणि युक्रेनने यासंदर्भात वेगवेगळे दावे केलेत (फाइल फोटो)

युक्रेनमध्ये सुरु असणाधऱ्या युद्धाचा आज ३८ वा दिवस आहे. मात्र अजूनही हे युद्ध संपुष्टात येण्याची काही चिन्हं दिसत नाहीयत. टर्कीने दोन्ही देशांमध्ये झालेल्या शांतता चर्चेनंतर रशियाने किव्हच्या आजूबाजूच्या परिसरामधून सैन्य मागे घेण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर रशियाकडून अनेक ठिकाणांवर हल्ले सुरुच आहेत. असं असतानाच बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार रशियन सैनिक चेर्नोबीलमधून माघारी परतत आहेत. मात्र हा निर्णय म्हणजे पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनमधून माघार घेतलीय की याचा संबंध किर्णोत्सर्गाशी आहे यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे.

नक्की वाचा >> “चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया…”; अमेरिकेने भारताला स्पष्टच सांगितलं

अचानक माघार…
समोर आलेल्या माहितीनुसार, सोव्हिएत युनियन अस्तित्वात असताना अणुभट्टीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या शहरामधून रशियन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केलीय. मात्र या शहरामधून रशियन सैन्य माघारी का परतत आहे यासंदर्भात खुलासा होऊ शकलेला नाही. तरी युक्रेनमधील जास्तीत जास्त भूप्रदेश ताब्यात घेण्याच्या इराद्याने युद्ध पुकारणाऱ्या रशियाने अचानक चेर्नोबिलमधून माघार घेण्यास सुरुवात केल्याने या निर्णयामधील गूढ अजून वाढलेय.

युक्रेन रशियाचा गुप्त करार?
युक्रेनमधील या अणुभट्टीवर नियंत्रण असणाऱ्या इनरगोटॉम या सरकारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रशियन लष्कराच्या दोन तुकड्यांनी चर्नोबिलमधून माघार घेतली असून त्या पुन्हा बेलारुसकडे मार्गस्थ झाल्या आहेत. यासंदर्भात युक्रेन आणि रशियामध्ये करार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनी या गुप्त करारासंदर्भातील वृत्ताला दुजोराही दिल्याचं बीबीसीच्या वृत्तात म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: “तिला हाकलून द्या”; पुतिन यांच्या Girlfriend विरोधात ५९ हजार अर्ज; हिटलरच्या पत्नीशी झाली तुलना

चेर्नोबिलचं महत्व काय?
चेर्नोबिल बेलारूस ते युक्रेनची राजधानी किव्ह या सर्वात लहान मार्गावर आहे. अशा स्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याला चर्नोबिल ताब्यात घेणे आवश्यक आहे. चेर्नोबिलबद्दल, पाश्चात्य लष्करी विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया बेलारूसच्या मार्गे आक्रमण करत किव्ह ताब्यात घेण्यासाठी उपलब्ध असणारा सर्वात सोप्या मार्गाचा वापर करतंय. बेलारूस आणि रशिया खूप जवळचे मित्रराष्ट्र आहेत. या देशाची सीमा युक्रेनला लागून आहे. येथे मोठ्या प्रमाणात रशियन सैनिक आणि शस्त्रे आहेत. पण आता या शहरातून किव्हकडे निघालेल्या लष्करी तुकड्या पुन्हा त्यांच्या बेलारुसमधील बेस कॅम्पकडे परत निघाल्याचं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियन संरक्षण मंत्र्यांना आला हार्ट अटॅक, सध्या ते…”

काही सैनिकांनी उपचारासाठी करण्यात आलं दाखल
युद्ध सुरु झाल्यानंतर रशियन सैनिकांनी चर्नोबिलवर ताबा मिळवला होता. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आक्रमण करणाऱ्या रशियन फौजांनी चर्नोबिल अणुभट्टीचा ताबा सोडण्याची घोषणा केलीय. युक्रेनने असंही म्हटलं आहे की, रशियन लष्कराने सर्वाधिक किरणोत्सर्ग होत असणाऱ्या या परिसरावर हल्ला करुन स्वत:वर संकट ओढवून घेतलं होतं. याच किरणोत्सर्गाचा फटका रशियन सैन्याला बसला असून त्यामुळेच ते माघार घेत असल्याचा युक्रेनचा दावा आहे. किरणोत्सर्गाचा परिणाम झालेल्या काही सैनिकांना उपचारासाठी बेलारुसला पाठवण्यात आलं आहे. बीबीसीच्या अहवालानुसार या ठिकाणी रशियन सैनिक खोदकाम करत होते. मात्र या ठिकाणी किरणोत्सर्ग होण्याचा एवढा मोठा धोका असल्याचा अंदाज त्यांना नव्हता असं सांगितलं जातं आहे. मात्र रशियाने याला दुजोरा दिला नसल्याने रशियन सैन्य नेमकं माघारी का फिरलंय याबद्दलचं गूढ कायम आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार जेव्हा त्यांनी या अणुभट्टीवर ताबा मिळवला होता तेव्हा त्यामधील किरणोत्सर्गाचं प्रमाण फारच मर्यादित होतं. मात्र सध्या परिस्थिती वेगळी असल्याचं रशियन लष्कराने माघार घेण्याच्या निर्णयावरुन दिसून येत आहे.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

रशियावर टीका आणि टाळण्यात आलेली प्रत्यक्ष पहाणी…
अणुशास्त्रज्ञांच्या मते चर्नोबिलमध्ये काही दशकांपूर्वी जे झालं ते पुन्हा घडण्याची शक्यता नव्हती. शेफील्ड विद्यापिठाच्या प्राध्यापक क्लेरी कॉर्कहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आता कोणताही न्यूक्लिअर रिअॅक्टर नाहीय. मात्र एखाद्या ठिकाणी किरणोत्सर्ग करणाऱ्या पदार्थांपासून निर्माण झालेला धूर असेल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. चार मार्च रोजी रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये चर्नोबिल अणुभट्टीमधील अडगळीचं सामान ठेवण्यात आलेल्या ठिकाणी आग लावण्यात आलेली. यावर आंतरराष्ट्रीण अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) रशियावर टीका केली होती. या ठिकाणी जाऊन पहाणी करण्याची तयारी आयएईएने केली होती. मात्र वैज्ञानिकांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच प्रत्यक्ष पहाणी टाळण्यात आली.

नक्की वाचा >> Ukraine War: “रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करत आहेत, एका महिलेच्या मुलांसमोरच…”

काय घडलं होतं नक्की इथं?

१९८६ सालच्या एप्रिल महिन्यात एका सुरक्षा प्रयोगादरम्यान चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोट झाला होता. स्फोटानंतर लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे ५६ कर्मचारी मृत्युमुखी पडले. अणुभट्टीच्या गाभ्यात मोठा स्फोट झाल्याने याची तीव्रता वाढली होती. स्फोटानंतर संपूर्ण युरोपमध्ये किरणोत्सर्ग पसरला होता.

किरणोत्सर्गाचा युरोपच्या बहुतांश भागांवर परिणाम होऊ लागला होता आणि रेडिएशन अमेरिकेपर्यंत पोहोचले होते. स्फोटानंतर, त्यातून किरणोत्सर्ग रोखण्यासाठी ते संरक्षणात्मक उपकरणाने झाकले गेले आणि संपूर्ण प्लांट बंद झाला. अणुभट्टीत स्फोट होऊन आजूबाजूच्या शेकडो किलोमीटरच्या परिसरात मोठी आण्विक वाफांची गळती झाली होती. किरणोत्सर्गी स्ट्रॉन्टियम, सीझियम आणि प्लुटोनियमचा प्रामुख्याने युक्रेन आणि शेजारील बेलारूस, तसेच रशिया आणि युरोपचा काही भाग प्रभावित झाला. या आपत्तीमुळे होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मृत्यूंची संख्या जगभरात किमान ९३,००० लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला.

नक्की वाचा >> पुतिन यांच्या जीवाला निकटवर्तीयांपासूनच धोका?; एक हजार शेफ, लॉण्ड्री बॉय आणि बॉडीगार्ड…

या भयानाक घटनेनंतर Livescience.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अपघातानंतर रेडिएशनचा प्रभाव २६०० स्क्वेअर किलोमीटरपर्यंत होता. पुढील २४ हजार वर्षे या ठिकाणी कोणीही मनुष्य राहू शकत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले होते. आता ते आण्विक कचरा साठवण्याचे केंद्र आहे. मोठ्या प्रमाणात अणुइंधन येथे ठेवले जाते. गेल्या वर्षी एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की या प्लांटमध्ये अजूनही इंधन धुमसत आहे. ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine big claim putin army retreats in chernobyl scsg

ताज्या बातम्या