युक्रेनचे मंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी रशियन संरक्षण मंत्री सेर्गेई शोईगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केलाय. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि शोईगु यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात आलाय. पुतिन आणि शोईगु यांच्यामध्ये युक्रेनमधील विशेष लष्करी मोहीम अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप झाले. पुतिन यांनी या अपयशासाठी शोईगु यांना जबाबदार ठरवलं. याचाच धसका घेतल्याने शोईगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं अँटोन यांचं म्हणणं आहे.

याच कारणामुळेच युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाचा निर्णय घेण्यामागे पुतिन यांच्यामागोमाग सर्वात महत्वाची भूमिका बजावत असणारे शोईगु सध्या समोर येत नसल्याचं सांगितलं जातंय. पुतिन यांच्यासोबतच्या वादानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते ११ मार्चपासून सार्वजनिक जीवनामध्ये दिसलेले नाही असा दावा अँटोन यांनी केलाय. २४ मार्च रोजी रशियन संरक्षण मंत्री टीव्हीवरील एका कार्यक्रमात दिसेल होते. मात्र हे व्हिडीओ आधीच शूट केलेले की आता हे मात्र कळू शकलं नाही. सध्या शोईगु यांच्यावर एन. एन. बुर्डेंको या लष्करी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याचा दावाही अँटोन यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

शोईगु हे अचानक बेपत्ती झाल्यापासून त्यांच्यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा चर्चेत आहेत. युक्रेनमधील किव्ह, खर्किव्हसारख्या महत्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्यात रशियन लष्कराला अपयश येत असल्याने त्यांना रशियन सरकारने शिक्षा दिल्याचं बोललं जात आहे. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार एका पत्रकार परिषदेमध्ये रशियन सरकारला हा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरु झाली.

रशियन सरकारचं सत्ता केंद्र क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या लष्करी मोहिमेमध्ये संरक्षण मंत्री व्यस्त आहेत. तसेच सध्याचा काळ हा प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करण्याचा नसल्याने ते समोर येत नाहीयत, असा दावा केलाय. यानंतर लगेचच टीव्हीवर सुरक्षाविषयक बैठकीमधील एक फुटेज प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये शोईंगु हे सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये सहाभागी झाल्याचं दिसत आहे. या बैठकीमध्ये रशियन लष्कराने पुतिन यांना मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती दिल्याचं सांगितलं जातंय.

“शोईगु हे राष्ट्रीय सुरक्षा समितीसमोर युक्रेन युद्धाचा तपशील मांडताना दिसले. लाइव्ह प्रसारणादरम्यान दाखवण्यात आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये शोईगु बोलताना दिसत नाहीयत. मात्र व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये ते उपस्थित असल्याचं दिसत आहे,” असं सीएनएनने म्हटलंय.