रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच असून रशियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची धमकीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली होती. दरम्यान, रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केलाय. अशातच आता रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

युक्रेनमध्ये रशियाकडून हवेतून दीर्घकाळ ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी प्राणघातक बॉम्बचा वापर केला जात आहे. युक्रेनमधील रशियन हल्ल्याचे निरीक्षण करणाऱ्या मानवाधिकार गटांनी आणि युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूताने सोमवारी हा आरोप केला. या लोकांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय.

आंतरराष्ट्रीय समुदाय अशा शस्त्रांच्या वापराच्या विरोधात आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच या दोन्ही संघटनांनी म्हटले आहे, की बंदी घातलेल्या क्लस्टर युद्धसामग्रीचा रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, रशियाने हे धोकादायक बॉम्ब ईशान्य युक्रेनमधील प्रीस्कूलवर वापरले जेथे नागरिक आश्रय घेण्यासाठी जमले होते, असा दावा मानवाधिकार गटांनी केला आहे.

Ukraine War: “रशिया युक्रेनमधील शाळा, अनाथाश्रमे, रुग्णालये, रुग्णवाहिकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करतोय”

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कारोवा यांनी अमेरिकन खासदारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, रशियाने थर्मोबॅरिक शस्त्राचा वापर केला आहे, ज्याला व्हॅक्यूम बॉम्ब देखील म्हटलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आई…मला फाशी….”; युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकानं आईला पाठवलेला शेवटचा मेसेज व्हायरल

व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?

जेव्हा व्हॅक्यूम बॉम्ब किंवा थर्मोबॅरिक शस्त्राचा स्फोट होतो तेव्हा ते आसपासच्या हवेतील ऑक्सिजन शोषून घेते. यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन मोठा स्फोट होतो. त्यामुळे सामान्य स्फोटापेक्षा जास्त काळ स्फोटाची लहर निर्माण होते. मानवी शरीराचे वाफेत रूपांतर करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे.