युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या खासदारांना रशियाविरुद्ध हस्तक्षेप करण्यासाठी आणि युक्रेनवर नो-फ्लाय झोन लागू करण्यासाठी भावनिक आवाहन केले. दरम्यान, झेलेन्स्की यांच्या भाषणाला अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांनी स्टँडिंग ओवेशन दिली होती. यावेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी खाकी आणि हिरव्या रंगाची टी-शर्ट घातली होती. त्यांनी टी-शर्ट घातल्यावरून एका अमेरिकन आर्थिक समालोचकाने ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेनंतर पीटर शिफ यांना ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘रशियन सैन्य आमच्या सैन्याला शस्त्रं पुरवतंय;’ युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की

यासंदर्भात पीटर शिफ यांनी ट्वीट करत म्हटलंय की, “युक्रेनसाठी हा कठीण काळ आहे, हे मी समजू शकतो, परंतु युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे घालायला सूट नाही का?”. पुढे ते म्हणाले, “मला यूएस काँग्रेसच्या सध्याच्या सदस्यांबद्दल फारसा आदर नाही, परंतु तरीही मी त्यांना टी-शर्ट घालून संबोधित करणार नाही. मला संस्थेचा किंवा युनायटेड स्टेट्सचा अनादर करायचा नाही.”

पीटर शिफ यांनी हे ट्विट करताच त्यांना ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. “मित्रा, तो युद्धक्षेत्रात आहे, जिथे सूट प्रेस आणि ड्राय क्लीन करून मिळणं कठीण आहे, याची मला तरी खात्री आहे. आणि जरी ते शक्य असलं तरी त्यांच्या देशातील लोक संघर्ष करत असताना ते सूट घालून कसे फिरू शकतात,” असं म्हणत एका ट्विटर युजरने शिफ यांना सुनावलंय.

रशिया-युक्रेन वादात भारत तटस्थ; पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली रशियाविरोधात भूमिका

काँग्रेसचे माजी उमेदवार शिफ यांनी त्याला उत्तर दिले की, “त्यांना सूट प्रेस करून आणण्याची गरज नाही. मला खात्री आहे की झेलेन्स्की यांच्या टी-शर्ट प्रमाणेच त्यांच्या कपाटात त्यांचा क्लीन सूट लटकलेला असेल. शिवाय सूट उपलब्ध नसेल तर किमान कॉलर आणि लांब बाही असलेला शर्ट तरी असेल.”

युक्रेनमध्ये थिएटरवर शक्तिशाली बॉम्बहल्ला, तब्बल १२०० नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून झेलेन्स्की यांचे जेवढे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये ते टी-शर्ट घालूनच दिसत आहेत. यावरूनच शिफ यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका केली आहे.