Ukrainian woman stabbed to death in train Video : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धापासून वाचण्यासाठी अमेरिकेत आश्रय घेतलेल्या एका युक्रेनियन निर्वासित तरुणीची एका हल्लेखोराने चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शार्लट लाईट रेल्वे ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.
आयरिना झारुत्स्का (Iryna Zarutska) असे पीडित २३ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती पिझ्झारिया येथे काम करत होती. हल्ला झाला त्यावेळी तरुणीने कामाच्या ठिकाणचा गणवेश घातलेला होता आणि ती २२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४६ वाजता Lynx Blue Line येथून रेल्वेत चढली होती. शार्लट एरिया ट्रांझिट सिस्टम (CATS)ने जारी केलेल्या व्हिडीओ फुटेजनुसार ही तरुणी तिच्या फोनमध्ये शांतपणे पाहात बसल्याचे दिसत आहे. तर हल्लेखोर हा ट्रेनमध्ये तिच्या पाठिमागे बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमकं काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या चार मिनिटांनंतर एक बेघर असलेल्या आणि यापूर्वीही तुरुंगात जाऊन आलेल्या डेकार्लोस ब्राउन जूनियर (वय-३४) याने एक फोल्डिंग चाकू काढला आणि झारुत्स्कावर तीन वार केले, ज्यामध्ये किमान एक वार हा तिच्या गळ्यावर केला.
या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ब्राउन हा त्याचे स्वेटशर्ट काढताना आणि ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी इतर प्रवासी रक्त पाहून घाबरल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर ती तरुणी तिचा गळा हतात पकडून बसली यावेळी तिचं रक्त ट्रेनच्या फरशीवर सांडत होते. पुढे ती जागेवरच कोसळली आणि तिचा ट्रेनमध्येच मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
Watch the full shocking footage from just a day ago showing Decarlos Brown Jr. b**tally carrying out an unprovoked attack on Ukrainian war refugee Iryna Zarutska in Charlotte, North Carolina.
— NOVEXA (@Novexa24) September 7, 2025
Follow: @Novexa24 pic.twitter.com/oWyJgrpfCw
तर ब्राउन हा पुढच्या स्टॉपवर ट्रेनमधून खाली उतरला, तेथेच त्याचा फोल्डिंग चाकू देखील आढळून आला. पोलिसांनी सांगितले की त्याच्या हाताला झालेल्या जखमेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर खूनाच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आले.
कोर्टातील रेकॉर्डनुसार, ब्राउन याचे २०११ पासून गुन्हेगारीशी संबंध राहिला आहे. सस्त्र आणि धमक्या देत दरोडा टाकणे यासरखअया गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच त्याने पाच वर्षे तुरुंगात घालवली आहेत. शरीराच्या आत असलेल्या मानवनिर्मित वस्तूमुळे कोणीतरी त्याला नियंत्रित करत असल्याचा दावा करत ९११ क्रमांकाचा चा गैरवापर केल्याबद्दल त्याला जानेवारीमध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती.
स्पेक्ट्रम न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये सुरक्षा रक्षक असूनदेखील हा हल्ला झाला. हल्ला घडला तेव्हा ट्रान्झिट सुरक्षा रक्षक हे याच ट्रेनच्या दुसऱ्या डब्यात होते. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी सहा मिनिटांच्या आथ घटनास्थळी धाव घेतली.
झारुत्स्काच्या कुटुंबीयांनी एक ‘गो-फंड मी’ मोहिम राबवली होती, ज्यातून ३८००० डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम जमा झाली होती. “ती काही दिवसांपूर्वीच युद्धापासून सुरक्षेसाठी आणि एका नव्या सुरूवातीच्या आशेने अमेरिकेत आली होती, दुर्दैवाने तिचे आयुष्य खूपच लवकर संपले,” असे या फंडरेझरमध्ये सांगण्यात आले.