Don Amir Tipu Balaz Tarkanwala Murder : पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या धांदल संपते न संपते तोच रविवारी एक मोठी बातमी पाकिस्तानात झळकली. लाहोरमधला सर्वात मोठा डॉन अमीर टीपू बलाज टक्रांवालाच्या हत्येची. एका लग्नात त्याची हत्या करण्यात आली. लाहोरचा किंग अशी त्याची ओळख असलेल्या बिल्ला ट्रकांवलाच्या नातवाची हत्या करण्यात आली. आमीर ट्रकांवाला कुटुंबातल्या चौथ्या वारसाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये गदारोळ माजला आहे.
१८ फेब्रुवारीला काय घडलं?
१८ फेब्रुवारी २०२४ ला लाहोरमध्ये एक लग्न होतं. त्यात लाहोरचा सर्वात देखणा डॉन आमीर ट्रकांवाला आला होता. त्याचा सर्वात जवळचा मित्र हमजाच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नात तो आला होता. अमीर ट्रकांवाला त्याच्या खास मित्रांसह आणि त्यांच्या भावांसह एका टेबलसमोर बसला होता. त्याच्या चारही बाजूला त्याचे बॉडी गार्ड होते. तेवढ्यात एक माणूस ट्रकांवाला जवळ आला आणि त्याच्यासह सेल्फी काढण्याची विनंती केली. दुसऱ्या क्षणी त्याने लपवलेलं हत्यार काढलं आणि आमीरवर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने गोळीबार सुरु झाला. सुरक्षा रक्षकांनी उत्तरादाखल गोळीबार केला. यात एक हल्लेखोर मारला गेला तर दुसरा पळाला. आमीरला गोळ्या लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज तकने या विषयचीचं वृत्त दिलं आहे.
डॉन आमीरच्या मृत्यूची बातमी प्रत्येक न्यूज चॅनलवर
१८ तारखेला ही घटना घडली. लाहोरच्या जिना रुग्णालयात आमीरचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक न्यूज चॅनलने ही बातमी दाखवली. पाकिस्तानच्या प्रत्येक न्यूज चॅनलवर निवडणुकीच्या बातम्या होत्या. मात्र नंतर याच बातम्या येऊ लागल्या.
अमीरचं शेवटचं स्टेटस
अमीर ट्रकांवालाने ‘ऐ खुदा जब तक जिंदगी मेरे लिये बेहतर है, मुझे जिंदा रख और जब मौत मेरे लिए बेहतर हो तो मुझे उठाले.’ हे स्टेटस त्याने ठेवलं होतं. त्याने या ओळी का लिहिल्या होत्या? याचाही शोध पोलीस घेत आहेत.