संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशी पाऊल उचलले आहे असे विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक आर्थिक समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी माझे सरकार प्रगतीशील धोरणात्मक निर्णय घेत आहे असे विजय ठाकूर सिंह म्हणाल्या. भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही हे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरचे नुकसान केल्याकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही भारताने निक्षून सांगितले.

जम्मू काश्मीर भारताचाच भाग, पाकिस्तानची अखेर कबुली
जम्मू काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली अखेर पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत अनेक आरोप केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जम्मू काश्मीर भारताचा भाग असल्याचं सांगितलं. “आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही?,” असा सवाल त्यांनी केला.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unhrc india answers to pakistan jammu kashmir article 370 dmp
First published on: 10-09-2019 at 20:19 IST