केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतेच लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Union Minister Ananth Kumar passed away at the age of 59, in Bengaluru last night.

पंतप्रधान मोदी शोक व्यक्त करताना म्हणाले की, अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी आपल्या युवा काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.

त्याचबरोबर, संरक्षमंत्री निर्मला सितारामण यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या निधनाने पक्षामध्ये दुःखद वातावरण आहे. त्यांनी भाजपाची मोठी सेवा केली. बंगळूरू त्यांना नेहमीच आपल्या हृदयात आणि स्मरणात ठेवेल.

आमचे वरिष्ठ सहकारी अनंत कुमार यांच्या निधनाची बातमी ही खूपच दुःखद बातमी आहे. ते अनुभवी संसदपटू होते, देशाची त्यांनी पूर्ण क्षमतेनं सेवा केली. लोकांसाठी काम करण्याची त्यांची निष्ठा आणि आवड होती. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सामील आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने कर्नाटकातील जनतेचे आणि देशाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, सहकार्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister ananth kumar passed away at the age of 59 in bengaluru last night karnataka
First published on: 12-11-2018 at 06:44 IST