सर्वाधिक बंधनं असलेलं राष्ट्र अशी जगभरात सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, येथील काही कठोर नियमांमध्ये आता शिथिलता देण्यास सरकारकडून सुरूवात झाली आहे. अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी येथील सरकारने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी सौदी अरेबियातील नियमांनुसार परदेशातून आलेल्या जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा. म्हणजेच विवाह दाखवणं बंधनकारक होतं. मात्र आता यापुढे ही अट नसेल. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचं मानलं जात आहे. याशिवाय, सर्व एकट्या महिलांना (सौदीच्या महिलांनाही) हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

“हॉटेल चेकिंगच्यावेळी नात्याचं प्रमाण सिद्ध करणारी कागदपत्र सौदी अरेबियाच्या नागरिकांना दाखवणं बंधनकारक असेल. पण, देशाबाहेरच्या जोडप्यांसाठी हे बंधनकारक नसेल. सर्व महिला ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील. तसेच सौदीच्या महिलादेखील हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील” असं सौदी सरकारच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची परवानगीही देण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unmarried foreign couples can now rent hotel rooms in saudi arabia sas
First published on: 07-10-2019 at 12:11 IST