उच्चजातीय आयोगाची स्थापना केल्याबद्दल बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भाजपच्या शासनावर टीकेची झोड उठवित, जदयूचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी उच्च जातीच्या गरिबांना कोणाताही राखीव कोटा मिळू नये, असे मत मांडले आह़े चांगली अर्थव्यवस्था त्यांना दारिद्रय़ातून बाहेर काढण्यास समर्थ आहे, असेही त्यांचे म्हणणे आह़े
आरक्षणाची व्यवस्था ही केवळ मागासवर्गीय आणि दलितांसाठीच आह़े त्यामुळे सवर्णाना कोणत्याही प्रकारचे आरक्षण देण्यात यावे, असे मला वाटत नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केल़े
उच्च जातीतील गरिबांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आणि आवश्यकता त्यांना आरक्षण देण्यासाठी बिहार शासनाने स्थापन केलेल्या उच्चजातीय आयोगावर त्यांनी जोरदार टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2013 रोजी प्रकाशित
उच्चजातीय गरिबांना कोणताही कोटा मिळू नये – जदयू
उच्चजातीय आयोगाची स्थापना केल्याबद्दल बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भाजपच्या शासनावर टीकेची झोड उठवित, जदयूचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी उच्च जातीच्या गरिबांना कोणाताही राखीव कोटा मिळू नये, असे मत मांडले आह़े चांगली अर्थव्यवस्था त्यांना दारिद्रय़ातून बाहेर काढण्यास समर्थ आहे, असेही त्यांचे म्हणणे आह़े
First published on: 18-03-2013 at 12:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upper castes poor should not get any quota jdu