काँग्रेसच्या माजी नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. भारत जोडो यात्रा ही द्वेषाच्या विरोधात असून प्रेम आणि सद्भावना पसरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होत आहे, अशी प्रतिक्रिया एका व्हिडिओद्वारे उर्मिला मातोंडकर यांनी दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच श्रीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात २० जानेवारी रोजी संजय राऊत आणि आज उर्मिला मातोंडकर सहभागी झाल्या. उर्मिला मातोंडकर यांचे सासर काश्मीरमध्ये आहे. आपल्या सासरी आल्यानंतर उर्मिला मातोंडकर कश्मीरी वेशभूषेत या यात्रेत दिसल्या.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2023 रोजी प्रकाशित
कश्मीरी वेशभूषेत उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी; म्हणाल्या, “प्रेम आणि सद्भावना भारतासाठी महत्त्वाची”
अभिनेत्रा उर्मिला मातोंडकर या शेवटच्या टप्प्यात जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 24-01-2023 at 11:55 IST
TOPICSउर्मिला मातोंडकरUrmila Matondkarकाँग्रेस सरचिटणीस राहुल गांधीभारत जोडो यात्राBharat Jodo Yatra
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila matondkar joins bharat jodo yatra with husband in jammu and kashmir kvg