मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तपासात भारताला सहकार्य करा आणि तुमच्या देशात सुरु असलेल्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला दम भरला आहे.
मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला हा भयावह होता. त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी पाकिस्तान सरकारला भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करत आलो आहोत. या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने भारताला पूर्णपणे सहकार्य करायला हवे. पाकिस्तानच्या भूमीत शिजणाऱया दहशतवादी संघटनांच्या मनसुब्यांना तेथील सरकारने आळा घातलाच पाहिजे, असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2016 रोजी प्रकाशित
२६/११ च्या तपासात भारताला सहकार्य करा, अमेरिकेचा पाकला दम
मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला हा भयावह होता.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 27-05-2016 at 13:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us asks pakistan to cooperate with india on 2611 probe